Sunday, February 2, 2020

do you know any more benifit about peepal tree

नमस्ते वाचकांनो ,
आज आपण पिंपळाच्या झाडाविषयी काही खास आणि महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहे.  तुम्हाला हि माहिती जर आवडली असेल तर लाईक ,कंमेंट,शेअर करायला विसरू नका. आणि माझा ब्लॉग वर येणारे नवनवीन माहिती वाचायला विसरू नका. https://ayurvedicinfo2020.blogspot.com


 १. पिंपळाचे झाड सर्वत्र दिसते .तो एक डेरेदार वृक्ष आहे. पिंपळाचे झाडचे नैसगिर्क महत्व आहे. जसे पिंपळ दिवसा सर्वात जास्त आक्सिजन बाहेर सोडतो .त्यामुळे या वृक्षाखाली बसल्यानंतर तप्त उन्हात सावली व गरवा मिळतो. पण त्याबरोबर ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू सहजपणे मिळतो. त्याने शरीराला व मनाला सतेजता येते. ऊल्हासितता येते. दमेकऱ्यांना हा वृक्ष म्हणजे कामधेनू आहे.! या झाडाचा प्रत्येक अवयव औषधी गन प्रदान करणार आहे!


२. पिंपळाचे आणखी एक  वैन्यानिक वैशिष्ट म्हणजे असे कि ,सर्व झाडे दिवसा कार्बन -डाय -ऑक्सईड  वायू घेतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. पिंपळ मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडते. परंतु रात्रीसुद्धा पिंपळाचे झाड ऑक्सिजन हवेत सोडते. हे पिंपळाचे खास वैशिष्ट आहे. अन्य झाडे रात्री कार्बन -डाय-ऑक्सईड हवेत सोडतात . याचा अर्थ असा कि, पिंपळाचे झाड म्हणजे २४ तास ऑक्सिजन देणारा टोलेजंग सिलेंडरच आहे! हि उपमा पिंपळाच्या झाडाच्या बाबतीत यथार्थ आहे !



३. पिंपळ बुद्धिवर्धक आहे,शक्तिवर्धक आहे, रक्तशुद्धीकारक आहे,त्वचारोगनाशक आहे. पोटाच्या विकारापासून दम्यासारख्या असाध्य विकारापर्यँत अनेकविध कष्टदायक विकारात गुणकारी आहे . पिंपळाच्या सालाची चहा प्राचीनकाळापासून ऋषीमुनी नियमित घेत आहेत हे किती लोकांना माहित हि नाही . 


४. पिंपळाच्या सालीचा चहा -

         चहात टॅनिन असते ते कॅफीत कॅफीन असते. टॅनिन आणि कॅफीन दोन्ही शरीराला घटक आहेत. पिंपळाच्या सालीचा चहा म्हणजे शक्ती आणि स्फ्रूर्तीचे कोठार आहे कोठार! उगीच नाही प्राचीन ऋषीमुनी पिंपळाच्या सालीचा चहा गेट होते ! हा चहा घरच्या घरी करता येतो. तो अवश्य करा आणि शक्ती आणि स्फ्रूर्तीला शरीरात संचार करून घ्या . हा चहा बनवण्याची रीत साधी व सोपी आहे .
         पिंपळाच्या झाडाची साल कुटा अथवा सालीचे चूर्ण काळबादेवीच्या वनौषधीच्या दुकानातून किंवा गोरागांधी - काळागांधी यांच्याकडे मिळते . ते घ्या . चहाच्या पावडरऐवजी हे चूर्ण पाण्यात टाका .व चांगले उकळू द्या त्यानंतर त्यात चवीप्रमाणे साखर किंवा गूळ टाका . झाला चहा ! हा गरम गरम चहा गाळून घ्या.  ओता आणि चहात दूध टाकतो तसा दूध टाकून स्वतः प्या आणि इतरांना प्यायला द्या ! हा चहा धातुवर्धक आहे. पौष्टीक आहे . शरीरातील रक्तदोष दूर करणारा आहे . हा चहा म्हणजे गरिबांचा बोर्नव्हिटा आहे. चावनप्राश आहे ! हि अहिशयोक्ती नाही .हा चहा जो नियमित घेईल तो याचा जरूर जरूर अनुभव घेईल .लहानांपासून ,वृद्धांपर्यन्त ,निरोगी माणसापासून रोगी माणसापर्यन्त प्रत्येकाने हा चहा घ्यावा , इतका तो गुणकारी आहें.

 https://ayurvedicinfo2020.blogspot.com

हि माहिती आयुर्वेदिक पुस्तकातून मिळवलेली आहे . वरील माहिती कशी वाटली जरूर सांगा आणि आवडली असेल तर लाईक .कंमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हि माहिती जास्तीस जास्त लोकं पर्यन्त शेअर करा आणि बघत राहा  https://ayurvedicinfo2020.blogspot.com


Take care of these things when dieting

                     Take care of these things when dieting                                              ayurvedicinfo2020.blogspot.co...